Breaking News

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचार्‍यांनी केली आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत


बीड,दि.12 - बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्रीधर सानप, प्रताप माने, नंदु सांगळे, सुदंर बांगर, विजय धायगुडे यांनी महाराष्ट्रच्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री ना.पंकजा मुंउे यांना त्यांचे परळी येथील निवास्थानी भेट घेवून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबीयांस आर्थिक सहाय्यता निधी म्हणुन रूपये 236000/-चा चेक मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला. 
                        या बाबत सविस्तर वृत्त असे की सद्यपरिस्थितीत मागील दोन ते चार वर्षापासून देशाचा कणा समजला जाणारा शेतकरी बांधवांचे कुटूंब दुष्काळाच्या झळा सोसत आहेत यामध्ये प्रामुख्याने कर्जबाजरीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसेच शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहेत. 
                दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसमोर अनेक यक्ष प्रश्‍न उभे राहू पाहत आहेत, मुलांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न कार्य होणे जिकरीचे होत चालले आहे. जिल्ह्यामध्ये अनेक नानविध सामाजिक संघटन, सहकारी मदतीचा ओघ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना मिळत आहे मग अशा वेळेस शेतकर्‍यांची बँक म्हणुन ओळखणी जाणारी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यास मागे सरणार नाहीत अशी भावना मनाशी बाळगुन बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी संघटनेने कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणुन देण्याचे आवाहन श्रीधर सानप, प्रताप माने यांनी केले आणि त्या आवाहनास बँकेच्या कर्मचार्‍यांनी भरपुर प्रतिसाद देवून रूपये 236000/-रूपये एवढी रक्कम जमा करून ना.पंकजा मुंडे यांच्याकडे सुर्पूद करण्यात आली आहे.
               बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटनेने बोलताना सांगितले की, सहाय्यता देण्याचा उपक्रम यापुढे राबवत राहणार असा मानस श्रीधर सानप, प्रताप माने, नंदु सांगळे, सुंदर बांगर, विजय धायगुडे आदींनी व्यक्त केला आहे.