Breaking News

बिंदूसरा नदीचे खोलीकरण करावे युक्रांदची पंकजाताई मुंडे यांच्याकडे मागणी


बीड,दि.12 - तालुक्यातील शेतकरंयाची जीवनावाहिनी म्हणुन ओळखली जाणारी बिंदुसरा नदी मृत अवस्थेत आहे. नदीचे पूनरूजीवन होणे आवश्यक आहे. या नदीचे खोलीकरण करावे अशी मागणी युक्रांदचे जिल्हाध्यक्ष पंउीत तुपे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने ग्रामविकास व जनसंधारण मंत्री तथा बीड च्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली. बिंदुसरा नदी ही बेनूसर येथून बालाघाटाच्या डोंगररांगेतून उगम पा1न कचारवाडी, बांगरवाडा, पाटोदा, बेलखंडी, वाळेकरवाडा, नागझरी, कदमवाडी, कोळेनाडा, पिंपळवाडी, भाळवणी, मांडवजाळी, वायकरवस्ती, मंझरी, पाली, वरवटी, आहेर वडगाव, आहेर धानोरा, बीड शहर, आंदनदवाडी, बहीरवाडी, शिदोड, लोळदगाव, कुर्ला पर्यंत वाहत जाऊन सिंदफणा नदीस मिळते. या नदीमध्ये पाळीव प्राणी यांची जीवनवाहीनी ही नदी आहे. तरी या नदीचा कृती आराखडा तयार करून खोलीकरण करावे अशी मागणी केली असता ना.मुंडे यांनी खोलीकरणाचे आश्‍वासन दिले. यावेळी तालुका संघटक श्रीराम शेळके, बबन थोरात, अशोक वाघमारे, राहुल कदम, आसाराम डोके, संजय कदम, राजेश ओव्हाळ, शेख अमर हे उपस्थित होते.