Breaking News

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करुन अनुशेष भरुन काढावा - किशोर चव्हाण


परभणी, 11 -  शहरातील सिटी पॅलेस येथे दि. 10 जानेवारी रोजी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, उपाध्यक्ष योगेश केवारे, प्रवक्ता सुभाषदादा जावळे, जिल्हाध्यक्ष माधव आवरगंड, गजानन जोगदंड, रामदास अवचार, भानुदासराव शिंदे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
स्वराज्य संकल्प शहाजी राजे भोसले यांच्या वेरुळ येथील स्मारकापासुन मराठवाड्यातील मराठा 
समाज, ओबीसी जागृती अभियानाची सुरूवात करून संपुर्ण मराठवाड्यात अभियान जाणार आहे. या 
अभियानामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालय मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा व अनुशेष भरुन 
काढावा यासाठी मराठा समाजबांधवांनी अधिकचे पुरावे द्यावेत व न्यायालयात नामांकित वकिलांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात बाजु मांडावी यासाठी मराठा समाजाने विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी सहकार्य करावे.  यासाठी हे अभियान असुन याचा समारोप 12 जानेवारी रोजी समारोप सिंधखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव या ठिकाणी होणार असल्याची माहिती छावा चे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी यावेळी दिली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी छावा कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.