Breaking News

अमावस्येनिमित्त नस्तनपूरला पदाधिकार्‍यांची दर्शनासाठी गर्दी


 नांदगाव /प्रतिनिधी। 11 - नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे शनि अमावास्यानिमित्त भाविकांची गर्दी केली होती. खासदार हेमंत गोडसे यांनीही दर्शन घेऊन पूजा, अभिषेक केला. 
भाविकांसाठी असणार्या उपलब्ध सुविधा, येथील दर्शनासाठी असलेली शिस्त, परिसराची स्वच्छता व नैसर्गिक सौंदर्य पाहता जिल्ह्यातील पहिल्या क्रमाकांचे तीर्थक्षेत्र म्हणून नस्तनपूरचा काही कालावधीत नावलौकिक होईल, असे खासदार गोडसे यांनी सांगितले.  शनिवारी येणार्या प्रत्येक अमावास्येला शनिदेवाची पूजा व अभिषेक करण्यात येतो. यात्रोत्सव साजरा केला जातो. राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी याठिकाणी दाखल होतात. जळगाव, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागातून भाविकांसाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.  तसेच यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांच्या हस्ते शनिदेवाची महापूजा, आरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण अग्रवाल, जनरल सेक्रेटरी अँड. अनिल अहेर आदि उपस्थित होते.