Breaking News

देशाची व स्वतःची प्रगती करुन आत्महत्या टाळा ः सत्यपाल महाराज


 मेहकर (कैलास राऊत) । 09 - मेहकर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दि. 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आयोजित सप्त खंजीरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमात वृत्तपत्रेवाचून देशाची व स्वतःची प्रगती करुन आत्महत्या टाळा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी आयोजकांनी 71 हजारांचा निधी जमा केला. डोणगांव येथील शिवाजी क्रिडांगणावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष प्रमोद बापु देशमुख तर उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सोहल शर्मा तर अतिथी म्हणून तहसिलदार निर्भय जैन, कृषी अधिकारी मधुकर काळे, ठाणेदार विशाल पाटील, सरपंच सौ.अनुराधाताई धांडे, राजेंद्र आखाडे, रमेश सावजी, कुंजन जैस्वाल, दिपक आखाडे, डॉ.गजानन उल्हामाले, अंकूश आलेगांवकर, ता.अ. गजानन चनेवार, राजेंद्र पळसकर, सुरेश आप्पा फिस्के, सुनिल आखाडे, संदिप पळसकर, वामनआप्पा चुकेवार, विष्णुपंत पाखरे, गजानन नवले, राजुआप्पा डोंगरे, प्रा. दिनोरे, आसीफ खान, जयचंद भाटीया दिलीप सावजी आदिं मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  याप्रसंगी पुरस्कार प्राप्त व उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार सै. महेबुब, सिध्देश्‍वर पवार, अमर राऊत, कैलास राऊत यांचा  सत्कार व घाटबोरी येथील विठ्ठल नवले, या विद्यार्थ्याला इंजिनीअरींगच्या शिक्षणासाठी ता.अध्यक्ष गजानन चनेवार यांनी 11 हजारांची नगदी स्वरुपात मदत दिली. कार्यक्रम स्थळी स्थानिक नवदाम्पत्य प्रा.शंतनु व सौ.संस्कृत आखाडे, यांनी त्यांना लग्न समारंभा प्रसंगी नगदी स्वरुपात मिळालेले 3 हजार 100 रुपयांची रक्कम दानपेटीत टाकुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. पत्रकार दिनाचे औचीत्य साधुन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना मदतनिधीसाठी डोणगांव नगरीत मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळी 38 हजार, घाटबोरी येथील 22 हजार, कंकाळ, विश्‍वी, गोहेगांव, दांदडे, पांगरखेड, टेंभुरखेड, नागेशवाडी, चिंचाळा, येथून उर्वरीत असा आयोजकांनी 71 हजारांचा निधी जमा केला आहे. हा निधी ‘नाम’ फाऊंडेशनला पाठविला जाणार आहे. सत्यपाल महाराजांनी समाजप्रबोधन करुन ग्रामीण पत्रकार बांधवांच्या या सामाजीक उपक्रमाची प्रशंसा करुन उपस्थित श्रोत्यांची सप्त खंजेरीच्या माध्यमातुन मने जिंकली.
संचलन हमीद मुल्लाजी तर आभार राजेश वाघमारे यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल ठोकळे, प्रकाश दांदडे, तानाजी नवले, संतोष नवले, पुरुषोत्तम लोखंडे, प्रा.चव्हाण, लक्ष्मण शिवणकर, सागर चंदन शिव, विकास शिंदे आदिंनी परिश्रम घेतले.