सहकार विद्या मंदिरतर्फे कॅन्सर रुग्णांना मदत
बुलडाणा (प्रतिनिधी) । 09 - स्थानिक सहकार विद्या मंदिरने शैक्षणिक क्षेत्रापुरते आपले कर्तव्यक्षेत्र मर्यादित न ठेवता गरीब कॅन्सर रुग्णांनादेखील केअरींग सोल्स फाऊंडेशनच्या माध्यमातुन आर्थीक मदतीचा हात देत आहे.
दरवर्षी सहकार विद्या मंदिर लखनौ, येथील केअरींग सोल्स फाऊंडेशनला विद्यार्थ्यांच्या सहकार्यातुन मदतनिधी देते. सहकारकडे जे गरीब कॅन्सर रुग्ण संपर्क साधतात त्यांची माहिती सदर संस्थेकडे देवून त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्यात येते.