’मोहन ग्रुप’च्या अमर भाटियांचा ट्रेन अपघातात मृत्यू
मुंबई, 17 - रेल्वेची धडक लागून मोहन ग्रुपच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर पैकी एक अमर भाटियांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री 1 च्या दरम्यान अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान हा अपघात घडल्याचे समजते आहे. रात्री 1 वाजल्याच्या दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसची धडक लागून भाटिया यांचा मृत्यू झाला.
या अपघाती मृत्यूमुळे सध्या अनेक प्रश्नांनाही तोंड फुटले आहे. नामांकित ब्लिडर ग्रुपचे पदाधीकारी असलेले भाटिया इतक्या रात्री रेल्वे ट्रॅकवर काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
