Breaking News

महेंद्रसिंग धोनीचा नवा विक्रम

नवी दिल्ली, 17 - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या वनडेच्या टॉससाठी उतरताच भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मटमध्ये मिळून 300 सामन्यांचे नेतृत्व करणारा धोनी तिसरा कर्णधार बनला. या मालिकेतील तिसरी वनडे ही धोनीची 189वा सामना आहे. धोनीने 60 कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते. तर 51 टी-20मध्ये आतापर्यंत नेतृत्व केले.