लिंगायत समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर - रामप्रभु मुंडेे
गंगाखेड(प्रतिनिधी), 9 - शहरातील लिंगायत समाजाचा सामाजिक प्रश्न व मुलभूत सोयींसह स्मशान भुमीमध्ये सर्व सोयी नगर परिषदच्या माध्यमातुन सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे यांनी संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमात केेले.
येथील पलसिध्द स्वामी लिंयागत मठामध्ये महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभे यांचा वतीने संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी मनोहर शेठ, सुभाष यशवंतकर, पांडुरंग शेटे, सुरेश वाघमारे, गणेश केंद्रे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांचा प्रतिमेस पुष्ण अर्पण करण्यात आले. पुढे बोलतांना माजी नगराध्यक्ष मुंडे म्हणाले की, संत जगनाडे महाराज महान संत होते त्यांनी समाजातील प्रत्येकांना योग्य शिकवण दिली अनेक अनिष्ठ प्रथावर त्यांनी बंद करुन सर्वांना सामाजिक प्रवाहात आणण्याचे कार्य केले. शहरातील लिंगायत समाजाचा स्मशान चे काम लवकरच सुरू करण्याम येईल समाजाचा समस्या व मुलभूत सोयी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर असेन अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. यावेळी श्री.ह.भ.प. भिमाशंकर महाराज यांनी संत संताजी
जगनाडे यांच्या जिवन कार्यावर प्रवचन करण्यात येवुन महाप्रसादाचे आयोजन झाले. पुण्यतिथी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.