राष्ट्रीयकृत बँक कर्मचार्यांचा देशव्यापी संप
परभणी, 9 - आज देशभरातील सर्व राष्ट्रीय बँकेचे कर्मचार्यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया च्या मॅनेजमेंट च्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला होता. स्टेट बँक ऑफ इंडीया ची मॅनेजमेंट आपल्या सहयोगी बँकांना आपल्या विलीनी करण्याचा विचारात असुन त्या विरोधात तसेच करीयर प्रोग्रेशन च्या विरोधात आज देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाचे कर्मचारी संपावर आहेत.
येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद च्या मुख्य शाखेसमोर परभणी शहर तसेच परिसरातील बँक कर्मचार्यांनी इंडीया बँकेच्या मॅनेजमेंट विरुध्द जोरदार निदर्शने केली. त्यास कर्मचारी संघटनेेचे सचिव चंद्रकांत लोखंडे, निलंगे, दिवण ढवळे यांनी मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज जिंतुरकर, आनंद देशपांडे, मेहत्रे उदय, देवराज, स्वप्नील, रोहन, सरदार खान, उबाळे यांनी परिश्रम घेतले.