Breaking News

प्रलंबीत मागण्यांसाठी मनपात कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन


अहमदनगर, 21 -  महापालिका कर्मचार्‍यांच्या प्रलंबित विविध विषयांच्या सोडवणुकीसाठी कामगार संघटनेने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेतील कर्मचार्‍यांना पदोन्नती अजूनही देण्यात आलेली नाही. निवड समितीची बैठक होत नसल्याने ही पदोन्नती रखडली आहे. निवड समितीचे तत्काळ आयोजन करून पदोन्नती मिळावी, 
महापालिकेतील कर्मचार्यांच्या ग्रॅच्युईटी, पेन्शन विक्री, सहाव्या वेतन आयोगाचा फरक व महागाई भत्त्याच्या फरकाच्या रकमा, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेतील थकीत बिले तसेच महापालिकेने कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात केलेल्या अहमदनगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कर्ज हप्त्याची थकीत देयके संबंधित पतसंस्थेस तत्काळ अदा करण्याची कार्यवाही करावी, महापालिका प्रशासन व कामगार युनियन यांच्यामधील संयुक्त बैठकीत निर्णयांची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी हे बेमुदत धरणे असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.