Breaking News

भुजबळांच्या एमईटी संस्थेला हायकोर्टाचा दणका

मुंबई, 28 - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. भुजबळांच्या एमईटी शिक्षण संस्थेकडे दत्तक तत्त्वावर ताब्यात असलेले जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान महापालिकेला परत करणे एमईटीला भाग पडणार आहे.
खासगी संस्थांनी उद्याने दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्यास महापालिकेने संमती दिली होती. भाडेपट्ट्याची मुदत संपल्यावर मात्र ती बाग जिथे आहे, जशी आहे त्या तत्त्वावर परत करण्याची नोटीस महापालिकेने एमईटीला बजावली होती.महापालिकेविरोधात एमईटीने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र महापालिकेच्या उद्यान धोरणात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एमईटीला उद्यान महापालिकेला परत करावं लागणार आहे. दत्तकतत्त्वार दिलेली उद्याने आणि मैदाने परत ताब्यात घ्या, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिकेला सांगितले.