Breaking News

टाइम्स’चे व्यवस्थापकीय संपादक अरिंदम सेन गुप्ता यांचे निधन

मुंबई, 28 - ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे व्यवस्थापकीय संपादक अरिंदम सेन गुप्ता यांचे गुरुवारी निधन झाले. कॅन्सरशी लढा अयशस्वी ठरल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ‘टाइम्स’ समूहाशी सेन गुप्ता यांचे जुने नाते होते.
दिल्ली विद्यापीठातून एमए केल्यानंतर अरिंदम सेन गुप्ता पत्रकारितेकडे वळले. 1982 पासून प्रोब मॅगझिन, द पॅट्रिऑट, सन्डे ऑब्झर्व्हर असा त्यांचा प्रवास झाला. 1988 मध्ये त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ जॉईन केले. 1991 मध्ये ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे समन्वय संपादक म्हणून त्यांनी सुरुवातीला काम पाहिले. त्यानंतर ‘इटी’च्या दिल्ली आवृत्तीचे ते संपादक झाले. 2004 पासून ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’त व्यवस्थापकीय संपादक म्हणून रुजू झाले.