Breaking News

देशातील स्मार्ट सिटींच्या पहिल्या टप्प्यातल्या 20 शहरांची नावे जाहीर

नवी दिल्ली, 28 - देशातल्या स्मार्ट सिटींच्या पहिल्या टप्प्यातल्या 20 शहरांची यादी केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी
जाहीर केली.
या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश करण्यात आला. सीमाभागातल्या बेळगावचाही या यादीत समावेश आहे. मध्यप्रदेशातल्या तीन शहरांचा या यादीत समावेश करण्यात आला. तर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्‍चिम बंगालमधील एकाही शहराचा या यादीत समावेश नाही. या पहिल्या यादी महाराष्ट्रातल्या किती शहरांचा समावेश होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. मात्र, दोन शहरांना स्थान देण्यात आले. देशातल्या एकूण 97 शहरांनी स्मार्ट सिटी योजनेच्या लाभासाठी अर्ज भरले होते. पहिल्या यादीततील स्मार्ट सिटी योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या 500 कोटींच्या निधीतून आर्थिक मदत मिळणार आहे. प्रत्येक वर्षाला 100 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.