खासदार पी. एम. रेड्डी यांना अटक
हैदराबाद, 17 - तिरुपती येथील विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकार्याला एका खासदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. मारहाण करणारे खासदार पी. एम. रेड्डी यांना आज या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
तिरुपती विमानतळावर रेड्डी यांनी एअर इंडियाच्या अधिकार्यास थोबाडीत मारली होती. 26 नोव्हेंबर 2015 रोजी हे प्रकरण घडलं होतं. रेड्डी यांच्यावर आज गुन्हा नोंदविण्यात आला. रेड्डी हे जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचे कडप्पा मतदारसंघाचे खासदार आहेत.
