डॉ. श्रीराम पांडे यांचे निधन
पुणे (प्रतिनिधी), 13 - आदर्श ज्येष्ठ नागरिक 2007 पुरस्कारप्राप्त डॉ. श्रीराम व्यंकटेश पांडे (वय- 71) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पर्किंन्सन्सच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, 2 मुलगे, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे माजी सचिव, महाराष्ट्र व्हेटनरी असोसिएशनचे माजी सचिव, अॅक्युप्रेशर कन्सल्टन्ट, पिंंपरी-चिंचवड महापालिकेच्या ट्रॅफिक मोबिलिटी कमिटीचे सदस्य, सांगवी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहराच्या ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष आणि मा
हिती अधिकार कार्यकर्ते अशी सर्व पदे त्यांनी भूषवली आहेत. 4 डिसेंबर 1937 साली सुकांडा (ता.मालेगाव, जि.वाशिम) येथे त्यांचा जन्म झाला होता. सकाळी 9 वाजता सांगवी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.