महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा
नाशिक /प्रतिनिधी। 6- 6 जानेवारी पत्रकारदिनाच्या दिवशी महाराष्ट्र पत्रकार संघ नाशिक शाखेच्या वतीने पंचवटी येथील पलुसकर सभागृहात सकाळी साडेआकरा वाजता, महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे पत्रकार जागृती अभियान राबविण्यात येत आहे.
तसेच जिल्हास्तरीय पत्रकारांचा गुणगौरव व पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष विश्वासराव देवकर गांवकरी संपादक, तर प्रमुख पाहुणे म्हणून योगेश घोलप आमदार अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त, वसंत गीते माजी आमदार, दशरथ पाटील माजी महापौर, सलीम शेख सभागृह नेते, वसुधा कराड, बाजीराव आव्हाड पीआय मुंबई नाका, तसेच रमेश शेवाळे,दीपक मौले, बाळासाहेब जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाभरातील तालुका स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणार्या पत्रकारांना यावेळी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कारामध्ये पुढारीचे नाशिक आवर्तीचे मुख्यबातमीदार ज्ञानेश्वर वाघ व लोकमतचे वार्ताहर गोकुळ सोनवणे, गावकरीचे मदन बोरसे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब
एरंडे, व पदाधिकारी डॉ.सुनील भावसार अनिल गोसावी, संजय जाधव, महेश गिरमे, विनोद वर्मा, प्रशांत नाईक, रेखा पोखरकर, ज्ञानेश्वर आंधळे, राजेश काळे, नरेंद्र पाटील, सागर अनाप यांनी सर्व जेष्ठ व युवा पत्रकारांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.