निवृत्त अधिकारी, कर्मचारी पुन्हा सेवेत
मुंबई, प्रतिनिधी, दि. 9 - विशिष्ट कामासाठी विशेष अर्हता तसेच संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. हे करताना नेहमीच्या नियमित मंजूर पदांवर करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार नसून ही पदे सेवा प्रवेश नियमानुसारच भरली जातील. त्यामुळे सरकारमधील नियमित पदभरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. विशेष कौशल्य धारण करणार्या उमेदवारांसाठी मंजूर पदसंख्येच्या कमाल 10 टक्के पदे भरण्याबाबत जी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्या मर्यादेतच करार पद्धतीने नियुक्ती करता येऊ शकेल. करार पद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप, आकस्मिकता, सार्वजनिक हित या बाबी विचारात घेण्यात येणार आहेत. या नियुक्त्यांमुळे सेवेतील कोणत्याही अधिकार्यांच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही. या नियुक्तीसाठी निश्चित केलेल्या विशिष्ट कामाचे स्वरूप आणि व्याप्ती विचारात घेता काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित केला जाईल. त्यानुसार जास्तीत जास्त एका वर्षासाठी नियुक्ती देण्यात येणार असून गरज पडल्यास दरवर्षी नूतनीकरण केले जाईल.
हमीपत्र देणे आवश्यक : नियुक्त करण्यात येणार्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्याकडे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे असून काम करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. नियुक्तीच्या कालावधीत संबंधित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार असून याबाबत त्याच्याकडून हमीपत्र घेण्यात येईल.