अत्याचार थांबविण्यासाठी स्वाभिमान जागृत करावा ः साळवे
अहमदनगर । प्रतिनिधी । 18 - दलितांच्या मुलांनी शैक्षणिक प्रवाहात येऊन शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली पाहिजे. उच्च शिक्षण घेतल्यानेच बहुजनांचे मुले शासकीय पदावर विराजमान होतील. या जिल्ह्यात दीन दलितांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अत्याचार थांबवण्यासाठी डॉ.बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान जागृत करावा व दलित कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन टायगर मुमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे यांनी केले.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे टायगर मुमेंट संघटनेच्या शाखेचे उद्घाटन नगर तालुक्यातील जेऊर येथे नुकतेच झाले यावेळी साळवे बोलत होते. याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष प्रमोद काकडे, पं.स.सदस्य गोविंद मोकाटे, जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, शाखा अध्यक्ष अमोल पाटोळे, उपाध्यक्ष निलेश पाटोळे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवराम पाटोळे, जिल्हा सरचिटणीस हुसेन सय्यद (मामू), अर्जुन साळवे, भाऊसाहेब आल्हाट, विकी वाघमारे, साहिल शेख, बबन पाटोळे, विकास सोनवणे, अनिल पाटोळे, विशाल साळवे, सुनिल उनवणे, नारायण शिंदे, बाबा शिंदे, शरद शिंदे, नवनाथ शिंदे, विजय पाटोळे, दादासाहेब सोनवणे, विनायक वाघमारे, संतोष वैरागर, संजय पाटिल, काशीनाथ पाटोळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
रमेश साळवे म्हणाले की, दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी संघटना कार्य करत आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यास युवकांना एकत्र करुन संघटनेच्या माध्यमातून कार्य चालू राहणार असल्याचे सांगून नवनिर्वाचित शाखा अध्यक्षांसह पदाधिकार्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचे स्वागत दादाबा सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचल विकी वाघमारे यांनी केले. उपस्थितांचे आभार संतोष वैरागर यांनी मानले. यावेळी ग्रामस्थांसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.