शहाजीराजे व जिजाऊ यांच्या इतिहासाचा अमुल्य ठेवा अहमदनगरमध्येच ः इंजि.ढाणे
अहमदनगर । प्रतिनिधी । 18 - मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हयाचे सन्वयक इंजि.नंदकुमार ढाणे म्हणाले की, शहाजीराजे व जिजाऊ यांचा इतिहास हा अहमदनगर शहरामध्ये आहे. मात्र तो शोधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचा महाराष्ट्रात एकत्र पुतळा असुन याची जोपासणा करणे हे आपले कर्तव्य आहे. अहमदनगर शहराला ऐतिहासिक वारसा असुन हा वारसा टिकवण्यासाठी सर्वांनीच एकदिलाने प्रयत्न केले पाहिजे. भविष्यात आपण या ठिकाणी जी मदत लागेल ती करण्यास तयार आहे. अहमदनगर जिल्ह्यात शहाजीराजे व जिजाऊंचा इतिहास आहे तो समाजासमोर आणण्यासाठी संभाजी ब्रिगडने प्रयत्न करयला पाहिजे.
यावेळी शहाजीराजे व जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कर्डिले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अतुल लहारे, न्याय कक्षाचे अॅड.शिवाजी कराळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्रीताई शितोळे, कांताताई बोठे, पद्माताई गांगर्डे, आशाताई साठे, मराठा वधुवर कक्षाचे तारकाराम झावरे, बप्पासाहेब बोडखे, बबनराव खिलारी, संभाजी भोसले, मराठा पतसंस्थेचे पोपटराव काळे, संपतराव साठे, बबनराव सुपेकर, महेश काकडे, अंकित सुपेकर, रणजीत रक्ताटे, निलेश पवार, पप्पु बोरुडे, संभाजी ब्रिगेडचे लक्ष्मणराव खोडदे, राजूभाई शेख, असिफखान दुलेखान, बहिरनाथ वाकळे, अशोक वारकड, सितराम काकडे, संतोष कोकाटे, अबिदखान दुलेखान, राहुल आल्हाट, अवी मेढे, कॉ.वाघस्कर आदि उपस्थित होते.
शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी स्वराज्य निर्माण करुन समाजाला एक नवी दिशा दिली आहे. शहाजीराजे आणि जिजाऊ यांचा बराचसा इतिहास हा अहमदनगर शहरामध्ये लपलेला आहे. तो इतिहास भविष्यात समाजा समाजासमोर आणण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, तसेच इतिहास कक्षाने काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मराठा सेवा संघाने 25 वर्षामध्ये महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारत देशाला प्रगल्भ विचारांचा वारसा दिला आहे. यामुळे बहुजनांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याचे काम केले आहे. मराठा सेवा संघ प्रणित इतिहास कक्षाच्या माध्यमातुन सुरु आहे आणि ते अविरत सुरुच राहणार आहे. यातुन माणसं घडू लागली आहेत, वाढू लागली आहेत, मोठा विचार करुन चिकित्सा करुन नवेविचार मोठ्या धाडसाने मांडू लागली आहेत. मराठा सेवा संघाचे 25 वर्षापुर्वी लावले हे वृक्ष आता वटवृक्षाच्या रुपात दिसत आहे.