जातीनिहाय स्त्रियांवर होणार्या अन्यायांच्या विरोधात मोहिम व कायद्यास चालना देण्याचाी गरज ः आ.डॉ.नीलम गोर्हे
पुणे (प्रतिनिधी), 12 - काशीकापडी समाजातील अनिष्ट प्रथांबाबत तसेच विविध समाजातील वाळीत टाकण्याच्या प्रथांसंदर्भात दिनांक 09 जानेवारी 2016 रोजी आ.डॉ.नीलम गोर्हे यांची, कोमल वर्दे व शिवाजी दावलेकर सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट घेतली.
त्यावेळी काशीकापडी समाजातील तसेच कोल्हाटी, 42 भटक्या विमुक्त समाजातील महापंचायतींबाबत निर्णय घेतले व आवाहन केले की बालविवाह थांबवणे व विधवांना पतीनिधनानंतर कोंडून ठेवणे, बाल व जरठ विवाह याबाबत त्या त्या समाजातील महिला व युवतींसाठी सामजिक माध्यमातून एकत्रीकरण व मदतसेवेचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ुहरीीं रिि वर आँरेंज हा ग्रुप बनविला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने महिलांच्या विरोधतील हिंसाचार थांबविण्यास दरमहा 25 तारखेस आँरेज डे पाळला जातो.जगातील सर्व देशात 25 नोव्हें ते 10 डिसेंबर महिलाहिंसाचारविरोधी मोहिमा आखल्या जातात. या विचार मोहिमातुन भारतिय व महाराष्ट्रातील खास करून जातपंचायत व गावकीतून होणार्या दुजाभावाच्या बद्दल मुलींना, स्रियांना व्यासपीठ दिले जाणार आहे. हा ग्रुप जीरपसश -स्त्री ीरज्ञ खपवक्षर यानावाने केला आहे. बहिष्कारविरोधी कायदा संमत होण्यासाठी सहक्रार्याची विनंती नीलमताईंना केली असता त्यावर वर साधकबाधक चर्चा हेाऊन मा.ऊद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी निश्चीतपणे पाठपुरावा करेन असे आश्वासन डॉ.गोर्हे यांनी दिले. जातपंचायतीतील पंचांनी स्वत:ची भूमिका प्रबोधन केले जावे व त्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील. शिवतीर्थावरील सभेत मा.ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी व्यापक व जातीभेदांच्या पलीकडील हिंदुत्वाची भूमिका मांडली होती, त्याला अनुसरून प्रत्यक्ष कामाची ही गरज आहे असे डॉ.गोर्हे यांनी सांगून ईतर धर्मातील मुली, महिला याही दुजाभाव व हिंसाचाराच्याबाबत आवाज ऊठवत आहेत. त्यांनाही सहकार्य करत आहोत व केले जाईल असे नीलमताईंनी स्पष्ट केले. कोमल वर्दे यांच्या धाडसाबद्दल नीलमताईंनी कौतुक केले व सत्कारही केला. यावेळी कोल्हाटी समाजाचे व काशीकापडी समाजीतील महिलांच्या प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी राजेंद्र शिंदे, सुनील जगताप, कैलास पठारे, मनीषा धारणे, राजू विटकार हे उपस्थित होते. येवला तालुक्यात 20 काँटस् ऐवजी 100 खाटांचे रूग्णालय ह्वावे यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख व शहप्रमुख राजकुमार लोणारी, संघटक राहूल लोणारी यांचे निवेदनही आ.नीलम गोर्हे यांना कोमल वर्दे यांनी सादर केले.