हुंड्यासाठी बहिणीचे लग्न मोडले; भावाची आत्महत्या
नांदेड, 21 - नांदेडच्या डोलारी गावात बहिणीचे लग्न मोडल्याचा धक्का सहन न झाल्याने सतिश कदम या तरूणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलाकडच्यांनी हुंड्यासाठीच लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे सतिशने हे पाऊल उचलले. सग्या सोय-यामध्ये ठरल्याप्रमाणे मुलीच्या आई- वडीलांनी सासरच्या मंडळीची सरबराई, देणे- घेणे केले. यावर्षी लग्न समारंभ उरकणार, लग्नाची तारीख निघणार, या अपेक्षेने सासरच्या मंडळीकडे नुकतेच गेले होते.
मात्र येथे सासरच्या मंडळींनी मुलींच्या वडिलांकडे ठरल्यापेक्षा जास्त दोन लाख रुपयाच्या आगाऊ रक्कमेची मागणी केली. ती मागणी पूर्ण केल्याशीवाय लग्नाची तारीख काढणार नाही. तसेच हे लग्न मोडण्यात येईल असे सांगण्यात आले. सासरच्या मंडळींचे हे बोल ऐकून सतीशचे संतुलन बिघडले. अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीत झालेल्या नापिकीने हैराण असताना आगाऊचा हुंडा कसा द्यायचा या विवंचनेत कुटुंब सापडले होते. त्यात ब
हिणीची सोयरिक मोडल्याचे दुख झालेल्या वीस वर्षीय सतीश कदमने गावातीलच सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.