Breaking News

नृत्यांगणा मृणालिनी साराभाई यांचे निधन

नवी दिल्ली, 21 - महान नृत्यांगणा मृणालिनी साराभाई यांचे गुरुवारी सकाळी दहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
मृणालिनी साराभाई यांना 1965 मध्ये पद्मश्री, तर 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ. विक्रम साराभाई यांच्या त्या पत्नी होत. 
त्यांच्यामागे मुलगा कार्तिकेय आणि मुलगी मल्लिका साराभाई ही दोन मुले आहेत. मागील काही दिवसांपासून वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना अहमदाबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. नंतर घरी नेण्यात आल्यावर सकाळी राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.