Breaking News

महानायक अभिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा अतुल्य भारत अभियानाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

नवी दिल्ली, 21 -  भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रियांका चोप्रासोबत तीन वर्षांचा करार केला आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने भारताची प्रतिमा 
देश-परदेशात सादर करण्यासाठी प्रियांका चोप्राला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर अभियानाची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आल्याचं सरकारने सांगितले.
आमीर खानला अतुल्य भारतच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरवरुन हटवल्यानंतर पर्यटन मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनवले. प्रसून जोशी मॅकेन 
एरिक्सन लिमिटेड या कंपनीसोबत 2.69 कोटी रुपयात ‘अतुल्य भारत’ अभियानाचा करार झाला होता.  मात्र तो करार रद्द झाल्याने आता आमीर खान 
अतुल्य भारतचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर नसेल, असे स्पष्टीकरण पर्यटन विभागाने दिले होते.
त्यामुळे अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा आता दोघेही अतिथी देवो भव म्हणताना दिसतील. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही कलाकारांनी ब्रॅण्ड अ
ॅम्बेसेडर बनण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून एकही पैसा घेतलेला नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी प्रियांका चोप्रा 
तसेच अमिताभ बच्चन यांना स्वच्छ भारत अभियानासाठीही नामांकित केले होते.