बारोमास हा निर्मीती प्रक्रियेतील एक टप्पा ः प्रा.देशमुख
बुलडाणा (प्रतिनिधी) । 19 - जिवणातील अनुभव उत्कटतेने मांडत गेलो. जे जगलो तसे लिहीत गेलो. लेखणीला वास्तवाची जोड दिल्याने लेखन वास्तववादी झाले. ग्रामिण जिवण आणि शेतीशी बालपणा पासुनच संबंध आला. वडील शेतकरी होते. त्यामुळे मुलाने शेतीला हातभार लावावा अशी त्यांची अपेक्षा होती. ते फार चुकीचेही नव्हते. परिस्थितीनुसार मी ही शेतीला हातभार लावत होतो. शिक्षण आणि शेती असा प्रवास सुरु असतांना बीएला ना.धो.महानोरांची कविता वाचण्यात आली. या कवितेच्या एवढा प्रेमात पडलो की मी सुध्दा एक तशीच कवितातयार केली. अशा प्रकारे साहित्तीक म्हणून माझा प्रवास सुरु झाला. घर आणि सभोवतालचे वातावरण हा माझ्या जगण्याचा आणि चिंतणाचा विषय होता. तोच बारोमासच्या माध्यमातूनमी मांडला. बारोमास लोकांना भावली. याचं कारण श्ेती जिवणांच वास्तवादी चित्रण हे आहे. बारोमासला साहित्य अकादमीने सन्मानीत होणे हा माझयासाठीही सुखद धक्का होता. असे उद्गार प्रा.सदानंद देशमुख यांनी काढले. स्थानिक बुलडाणा अर्बन सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 65 व्या विदर्भ संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात ाला. अध्यक्षपदी डॉ.गणेश गायकवाड हे होते तर बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, नरेंद्र लांजेवार, गोविंद गायकी, राजेंद्र काळे, राजेश शेगोकार, अजिम नवाज राही यांची विशेष उपस्थिती होती. 65 व्यक्ती व संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
बारोमासच्या निर्मीती प्रक्रियेची उकल यावेळी प्रा.सदानंद देशमुख यांनी केली. व जिवणातील निर्मीती प्रक्रीयेतील टप्पे विषद केले. मुक्त पत्रकार नरेंद्र लांजेवार यांनी प्रास्ताविकातुन भूमीका मांडली. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आज प्रा.सदानंद देशमुख यांचा सत्कार केल्याजात आहे. परंतू लवकरच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, प्रा.सदानंद देशमुख यांच्या साहित्यातुन शेतकरी चळवळीला प्रेरणा मिळते. शेतकर्यांची व्यथा खर्या अर्थाने जगजाहीर करुन पांढरपेशा समाजाला कृषकांच जिणे त्यांच्यामुळे कळले आहे. शेतकरी आत्महत्यावर शेतकर्यांचे समुपदेशन करण्यापेक्षा या पांढरपेशा वर्गाचे समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तर बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनीही प्रा.देशमुखांना सदिच्छा दिल्या. यावेळी पत्रकार राजेंद्र काळे, पत्रकार राजेश शेगोकार कवी गोविंद गायकी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षिय भाषणातून डॉ.गायकवाड यांनी प्रा.देशमुखांचा गौरव करित साहित्याच्या प्रांतातील मोठा माणूस असा गौरव केला. संचलन कवि अजिम नवाझ नाही यांनी केले.