हिसारकडून राजधानी दिल्लीकडे सैन्याने कूच : तिवारी
नवी दिल्ली, 10 - हिसारकडून राजधानी दिल्लीकडे 2012 मध्ये भारतीय लष्करी जवानांनी कूच केलेल्या वृत्तामध्ये तथ्य असल्याचे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने 4 एप्रिल 2012 मध्ये हे वृत्त प्रसिद्ध केले होते. भारतीय सैन्य 16 जानेवारी 2012 मध्ये दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह होते. तेव्हा सिंह यांनी जन्मतारखेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हरियानातील हिसार येथील 33 व्या आर्म डिव्हिजनचे सैन्य आणि मथुरा येथील काही तुकड्या दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत होते.
याविषयी बोलताना तिवारी म्हणाले की, तेव्हा आम्हाला यासाठी संरक्षण क्षेत्रातील अधिकार्यांची स्थायी समिती स्थापन
करावी लागली होती. दुर्दैव असले तरी हे वृत्त सत्य आहे. सैन्याने दिल्लीकडे कूच केल्याच्या वृत्तात तथ्य आहे.