Breaking News

अंधेरीमध्ये कारची 6 जणांना धडक, चौघे गंभीर

मुंबई, 10 - मुंबईतील अंधेरीमध्ये एका भरधाव कारने 6 जणांना धडक दिली आहे. ही घटना घटना काल रात्री घडली. अपघातातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे.
74 वर्षीय श्रीचंद्र पंजाबी हे तेली गल्लीतून जात होते. त्याचवेळी त्याचे कारवरचे नियंत्रण सुट
ले आणि कारने रस्त्या शेजारी असलेल्या एका कुटुंबाला धडक दिली. त्यात एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह दोन मुली जखमी झाल्या आहेत, तर आणखी दोन तरुणांनाही या गाडीची धडक बसली. दरम्यान, जखमींना क्रिटीकेअर हॉस्पटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे.