Breaking News

शिवकार्य गडकोट मोहीम, सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे आज दुर्ग जागृती अभियान


 नाशिक/प्रतिनिधी। 12 -  शिवकार्य गडकोट मोहीम ,नाशिक व सह्याद्री प्रतिष्टान च्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 जानेवारी 2016 रोजी  ,राजमाता जिजाऊ व  स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने नाशिकरोड येथे सकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान मजदूर संघाच्या हॉल मध्ये  प्रेस कामगार शिवनेरी ग्रुप वतीने दुर्गजागृती अभियान  हा गडकिल्ल्यांच्या संवर्धन कार्याच्या प्रबोधनाचा जनजागृत्ती कार्यक्रम होणार आहे, तर सायंकाळी  ते  दरम्यान नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी  हुतात्मा स्मारकाशेजारी असलेल्या  छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोरील  प्रांगणात   स्वातंत्र्य लढ्यात दुर्गांचे योगदान या विषयावर जेष्ठ इतिहास अभ्यासक, लेखक डॉ.जी.बी. शहा यांचे व्याख्यान होणार आहे. 
या वेळी नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची इतन्भूत माहिती असणारी तसेच दुर्गसंवर्धन कार्याबद्दलचे पोस्टर 
प्रदर्शनी लावण्यात येणार आहे ,याची सर्वांनी नोंद घ्यावी ,मोठ्या संखेनी शिवभक्तानी,दुर्गभक्तांनी या 
व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रेस कामगार शिवनेरी ग्रुप,शिवकार्य गडकोट मोहीम,सह्याद्री प्रतिष्टान वतीने करण्यात आले आहे.