Breaking News

संघटीतपणामुळे समाजाचा विकास - मनापा आयुक्त प्रवीण गेडाम


 नाशिक/प्रतिनिधी। 12 -  संघटन ही काळाची गरज आहे संघटीतपनातुनच समाजाचा विकास होतो आणि संघटीत असा विकसित समाज गाव ,शहर, राज्य आणि राष्ट्र विकासाचा मजबूत धागा बनतो .आपले हे संघटन हि स्मार्ट नाशिक च्या विकासाला कारणीभूत ठरू द्या . समाजाचे योगदान विकास प्रक्रियेत द्या असे आवाहन मनापा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले .देशमुख मराठा समाज नाशिक जिल्हाच्या वतीने दिनदर्शिका 2016 चे  प्रकाशन मनपा आयुक्त डॉ . प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. रविवार दि जानेवारी कालिका माता मंदिर विश्‍वस्थ संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या छोटेखाणी सभागृहास डॉ . प्रवीण गेडामयाच्या सह महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक शैलेद्र तनपुरे , मनपा मुख्य लेखापरीक्षक गिरीश देशमुख ,भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, कालिका मत मंदिराचे विश्‍वस्थ दत्ता पाटील परमानंद कोठुळे ,प्रतापदादा देशमुख ,निफाडच्या उपनगराध्यक्ष सुनिता कुंदे यांच्या सह समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते . या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला .इंग्लिश मेरेथोन मध्ये सुवर्ण पदक मिळविलेल्या दहावर्षीय स्नेहल देशमुख चा हि याठिकाणी सत्कार करण्यात आला .हा सोहळा यशस्वी व्हावा म्हणून राजाराम देशमुख,रघुनाथ सोमवंशी,तुषार देशमुख ,दुर्गेश पवार ,उदय देशमुख ,रदिलीपराव देशमुख ,अशोक देशमुख ,उल्हास देशमुख ,संतोष कोठावदे ,सिद्धार्थ देशमुख ,अनिल देशमुख ,राजेंद्र देशमुख,यांनी विशेष परिश्रम घेतले. दिनदर्शिका सोहळ्या नंतर या ठिकाणी वधुवर मेळावाही संपन्न झाला या सोहळ्यात शेकडो वधु वरांचे परिचय झाला .  गेल्या 10 वर्षा पासून हि नोदनिकृत संस्था समाजाचा आर्थिक सामाजिक ,सांस्कृतिक व शेक्षणिक स्थर उंचाविण्यासाठी प्रयत्न शील असून अधिक समाज बांधवांनी या कार्यात सहभागी व्हावे तसेच संस्थेच्या कार्यालयात वधूवराच्या नावाची नोदणी करून परिचय पत्र द्यावे व संस्थेचे अजीव सभासद व्हावे व देशमुख मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले . यावेळी नाशिक,नगर  यांसह अन्य जिल्हातील शेकडो देशमुख मराठा समाजातील मंडळी उपस्थित होते.