Breaking News

जिल्हधिकारी तुकाराम मुंढे यांचे आज स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन


बीड,दि. 9 -  जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा सोलापूरचे जिल्हाधिकारी मा.तुकाराम मुंढे हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी दिनाक 9 जानेवारी 2016 रोजी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे सकाळी 10.30 वाजता मार्गदर्शन करणार असून या संधीचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन संयोजन समितच्या वतीने करण्यात येत आहे.
    बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. या जिल्ह्यात अनेक हुशार विद्यार्थी आहेत परंतू त्यांना पाहिजे तसे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे स्पर्धा परिक्षेला सामोरे जाताना या स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करायची या संदर्भात शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सकाळी 10.30 वाजता बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ताडसोन्ना येथील रहिवासी असलेले व सध्या सोलापूर येथे जिलहाधिकारी म्हणुन कार्यरत असलेले मा. तुकाराम मुंढे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य, डॉ.वसंत सानप, प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे, प्राचार्य डॉ.विद्यासागर जोशी, प्राचार्य डॉ.मोहंमद इलियास, प्राचार्य डॉ.मोहंमद जिलानी शहा, प्राचार्य डॉ.माधव गादेकर, प्राचार्य विनायक देशमुख, प्राचार्य शशिकांत डिकले, प्राचार्य दिनकर तेलप, प्रा.शरद पवार, सुनिल माने, महादेव धांडे, डॉ. रणजित मस्के, आण्णासाहेब परांडकर, लक्ष्मण माने, डॉ.छत्रपती पांगारकर, प्रा.बाळासाहेब लाखे, बळीराम घाडगे, जगदीश करपे, प्रा.गोपाळ धांडे यांनी केले आहे.