कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत करायचीकी नाही, सरकार गोंधळात
बीड,दि. 9 - सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षीही बीड जिल्ह्यातील पिकांची आनेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे उडीद, तूर,मुग, बाजरीसह अन्य पिकांची नुकसान भरपाई म्हणुन 131 कोटी रूपये सकारने जिल्ह्याला दिले असले तरी दोनशे हेक्टरपेक्षा जास्त कापसाचा पेरा करणार्या शेतकर्यांना कवडीचीही मदत दिली नसयाने जिल्ह्यात सरकारविरूद्ध संताप व्यक्त केला जात असताना सरकार आता या कापूस उत्पादक 200 हेक्टरपेक्षा जास्त कापूस उत्पादक शेकर्यांच्या शेतात पंचनामा करायचा कसा? एक हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर मदत करायची कशी? या गोंधळात शासन आणि प्रशासन व्यवस्था अडकली आहे.
50 पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या भागांमधील शेतकर्यांना सरकारने आर्थिक मदतीची घोषणा करून मदत शेतकर्यांपर्यंत पोहविण्यास सुरूवात केली आहे. बीड जिल्ह्यात कापूस वगळता अन्य पिकांसाठी 131 कोटींची मदत सरकारने पाठविली आहे. परंतु बीउ जिल्ह हा कापूस उत्पादक शेतकर्यांचा जिल्हा आहे गेल्य हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकर्यांनी 200 हेक्टरपेक्षा जास्त शेतीवर कपाशीची लागवड केली आहे. थोड्याफार शेतामध्ये अन्य पिक घेत जास्त शेतीमध्ये नगदी पिक म्हणुन ओळखल्या जाणार्या कपाशीची लागवड केली आहे. मात्र सरकारने कापसालाच मदत नाकारल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. मोठा खर्च करून शेतकर्यांच्या हातात कापसाचे उत्पन्न मिळाले नाही. 50 पैशापेक्षा कमी आणेवारी यामध्ये आली आहे. सरकारने कापूस मदतीतून वगळल्यानंतर राज्यभरात शेतकर्यात तिव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. अशा स्थितीत सरकारने आता कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत करण्याचा विचार सुरू केला आहे. पंरतु कापूस उत्पादक शेतकर्यांच्या शेतातील कापसाचा पंचनामा करायचा कोणी? तो कधी करायचा? कसश करायचा?या विचारात शासन प्रशासन व्यवस्था असल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे लवकरात लवकर सरकारने कापूस उत्पादक शेतकर्यांच्या शेतातील पंचनामे केले नाही तर कोण कापूस उत्पादक शेतकरी हे समजणे मुश्किल होईल. बीड जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्याने आणि एक हेक्टरपेक्षा जास्त शेतीमध्ये कापसाचं उत्पादन घेतल्यामुळे सरकारही नेमके एका शेतकर्याला किती हेक्टरसाठी मदत करायची याही अडचणीत आले आहे. एकूणच सरकारच्या भोंगळ आणि दुर्लक्षित कारभाचा जेवढा शेतकर्यांना फटका बसत आहे तेवढाच सरकारलाही याचा भविष्यात फटका बसणार आहे.