शौचालयाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सीईओंनी घेतली सरपंचाची बैठक
बीड,दि. 9 - स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गाव पाणंदमुक्त करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी जि.प.चे सीईओ नामदेव ननावरे यांनी बीड येथे सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेतली आहे. या बैठकीला सात तालुक्यातील सरपंचासह ग्रामसेवकांची उपस्थिती होती.
शौचालयांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जि.प.चे सीईओ नामदेव ननावरे यांनी आंबेडकर भवन येथील सभागृहात आष्टी,पाटोदा,शिरूर, गेवराई,बीड वडवणी, माजलगाव या सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेतली. सरदील बैठकीला ननावरे यांनी मार्गदर्शन केले तसेच अंबाजोगाई पंचायत समिती या ठिकाणीही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निला यांनी अंबाजोगाई, परळी, केज, धारूर येथील सरपंचांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये स्वच्छतेबाब मार्गदर्शन जि.प.च्या अधिकार्यांनी केले. लवकरात लवकर शौचालय बांधून घ्यावे, अशा सूचना संबंधित गावच्या सरपंचांना देण्यात आल्या.