Breaking News

अंगठी चोरण्यासाठी शेतात गेलेल्या वृध्दावर खूनी हल्ला


सातारा, 11 - सातारा तालुक्यातील कोंढवली-लिंब येथे शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या वृध्दाला धारदार शस्त्राने जखमी करुन चोरट्याने अर्धा तोळे सोन्याची अंगठी जबरदस्तीने लंपास केली आहे. किसन बाबूराव चोरट (वय 69, रा. कोंढवली) यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
सकाळी नऊला ते पाणी पाजण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या मागून फिरत होता. त्यांनी त्याला हटकत विचारणा केली. त्यावेळी गावात पाहुणा आहे व शेताला पाणी पाजायला आलोय असे सांगत त्याने बोलायला सुरवात केली. बोलताना त्याने धारदार शस्त्र काढून किसन यांना जखमी केली. त्याने धमकावत त्यांच्या हातातील अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली तसेच खिशातील पाकीट काढण्यास सांगितले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने शिवारातील काम करणार्‍या महिला घटनास्थळी यायला लागल्या. ते पाहून चोरटा पसार झाला. त्यानंतर किसन यांच्या फिर्यादीनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.