Breaking News

भुसावळ हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


 भुसावळ/प्रतिनिधी। 4 - सातपुडा शिक्षण संस्था संचलित भुसावळ हायस्कूलमध्ये स्पंदन वार्षिक  हसंमेलन नुकेतच मोठया उत्साहात पार पडले.
अध्यक्षस्थानी शाळा चेअरमन ए.एन. शुक्ल होते.उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना भुसावळ रेल्वे विभागाचे सिनिअर डीईएन पवन पाटील यांनी वेळेचा सदुपयोग स्पष्ट करताना अनेक उदाहरणे दिली. हिंदी साहित्यकार कवी हरिवंशराय बच्चन यांची गाजलेली कविता ’कोशिश करनेवाले की कभी हार नही होती’ या कवितेच्या ओळींचा आशय सांगत ते म्हणाले की, जीवनाची महती कळणे गरजेचे आहे.ज्या कुणाला मोठं व्हायचं असेल त्यांनी मुंगीचे उदाहरण डोळयासमोर ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे.
सुरेश एन. पाटील, संस्था सचिव व्ही.एम. महाजन, जे.एच. चौधरी, मुख्याध्यापक एच.डी. धांडे, पर्यवेक्षक एस.आर. झांबरे, के.एन. जमादार, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नारायण पाटील, एस.बी. पाटील उपस्थित होते. विनोद पी. शेजवळ यांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी’ ही गीते  सादरकेली. महाराष्ट्र दर्शनात सर्वप्रथम वासुदेव आला या सकाळच्या पहाट प्रसंगाने रंग भरला.या विद्यार्थ्यांनी सादर केले कलाविष्कार गीत - वासुदेव आला- कलाकार डिंपल वाघ, वैष्णवी सोनवणे, निकिता पाटील, निकिता जोनवाल, तेजस्विनी सोनवणे, पल्लवी भोई, सुजाता पाटील, दिव्या पवार, विशाखा चौधरी, दिव्यानी पाचपोळे, वैभव पिसाळकर, ललित पाटील, ऋषिकेश पखिडे, भूषण बैसाणे, गीत- जय मल्हार- अंजली कानडे, शुभांगी भोई, कृष्ण अवतार- योगिता चौधरी, भाग्यश्री चौधरी, जागृती बर्हाटे, भूमिका बर्हाटे, खुशबू गोफणे, हर्षदा बर्हाटे, श्‍वेता तायडे, सत्यशोधक नाटक- राहुल महाले, वैभव पिसाळकर, गौरव पिसाळकर, युवराज मिटकर, जागृती बर्हाटे, लेझीम - निकिता जोनवाल, कोमल बिर्हाडे, सुजाता पाटील, गायत्री सावळे, सोनम माळी, प्रियंका उबाळे, डोल डोलतंय वार्यावर- प्रियंका पाटील, लीशा केदारे, विशाखा
जोशी, निकिता निकम, गौरव लहाने, महेश बैसाणे, यश लोहार, भावेश पाटील, ढोलकीच्या तालावर - संजना बासनवाल, स्नेहा कछवे, भारुड- विवर्णा महाले, महेक तडवी, मानसी माळी, तेजस्विनी माळी, सीमा गवळी, वैशाली सोळंके, दिनेश भोई, ईश्‍वर तळेले, योश सोनवणे, कुणाल भोई, उदे गं अम्बे उदे- तोषिता पिसाळकर, खुशबू पिसाळकर, जिनकी है बेटियां (गायन)- राहुल महाले, जोगवा - प्राजक्ता जाधव, प्रेरणा पाटील, वैष्णवी काळे, प्रज्ञा सोनवणे, निशा भोई, पिंगा गं पोरी पिंगा- शिवानी रणदिवे, भूमी लाम्हणे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे- रुचिका इंगळे, अंकुश बरडे, मयूरी सातारकर, नेहा नेवेस्कर, लोकेश तळेगावकर, योगिनी सोळंके, मोहिनी पाटील, योगेश भोगे, लल्लाटी भंडार- समीक्षा तायडे, छाया नेवेस्कर, खान्देशची शेतकरीण (एकांकिका)- भाग्यश्री चौधरी, जय वाल्मीक बोलो- हर्षदा तायडे, मंगला कोळी, प्राजक्ता तायडे, सारे जहाँ से अच्छा- अरविंद सोनवणे व ग्रुप, दिल दोस्ती दुनियादारी - जागृती बर्हाटे.सूत्रसंचालन मनीष गुरचळ, विनोद शेजवळ, गायत्री सरोदे यांनी केले.