Breaking News

श्रद्धा कपूरने सलग 72 तास केले काम
मुंबई,  4 - अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या दोन चित्रपटांसह एका जाहिरातीच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. यावेळी तिने सलग 72 तास काम केले. श्रद्धा सध्या बँकॉकमध्ये आपला आगामी चित्रपट ’बागी’चे शूटिंग करीत आहे. यावेळी एका बˆँडच्या प्रचारासाठी तिने पत्रकार परिषद घेतली. त्यासाठी ती बँकॉकहून रात्रभर शूटिंग केल्यानंतर विमानाने मुंबईला रवाना झाली होती. सूत्रानुसार, श्रद्धा काही तासांसाठी मुंबईला पोचली आणि येथे पत्रकार परिषदेला सामोरे गेली. यानंतर तिने दोन बैठकांत सहभाग घेतला आणि पुन्हा बँकॉकसाठी रवाना झाली. जेणेकरून चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम होणार नाही. श्रद्धाच्या प्रवक्त्याने याची पुष्टि करताना म्हटले की, ’’श्रद्धा बˆँडविषयीची आपली कटीबद्धता पूर्ण करण्यासाठी फक्त दोन तासांसाठी मुंबईला आली आणि
पुन्हा शूटिंगसाठी परतली.’