बालकाच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
सांगली. 13 - बालक संचित वय अंदाजे 4 दिवस, पुरुष जातीचे अर्भक भारतीय समाज सेवा केंद्र, घनशामनगर, सांगली, माधवनगर रोड या संस्थेच्या पायरीवर हिरव्या रंगाच्या साडीच्या दुपट्ट्यात गुंडाळलेल्या अवस्थेत संस्थेची स्टाफ नर्स दीपा संतोष कुंभार यांना दिनांक 18 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 7 वाजता आढळले. या बालकाच्या नातेवाईकांनी पुढील 30 दिवसात संस्थेशी, बाल कल्याण समिती अथवा जिल्हा बाल संरक्षण सांगली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रभाकर माने यांनी केले आहे. संस्थेने याबाबत संजयनगर पोलिसांना तात्काळ माहिती दिली असून या बालकास संस्थेत दाखल केले आहे. बालकाचे नाव संचित असे ठेवण्यात आले आहे. विहित वेळेत बालकाच्या नातेवाईकांनी संपर्क न केल्यास बालकाच्या पुनर्वसनाची प्रकिङ्घया सुरु केली जाईल, असे श्री. माने यांनी स्पष्ट केले आहे. संपर्कासाठी पत्ता पुढीलप्रमाणे - भारतीय समाज सेवा केंद्र - कर्ण, घन:शामनगर, माळ बंगल्याच्या पाठीमागे, माधवनगर रोड, सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2314639, मो.नं. 7058052143.