Breaking News

महापालिका वाहनांवर निर्बंध


सांगली. 13 - शासकीय वाहनांचा खासगी व घरगुती कारणासाठी होणारा वापर नवा नाही. पण त्याला आता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी चाप लावण्याचा निर्धार केला आहे. विशेषत: महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकार्‍यांंवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी खासगी कारणासाठी अधिकार्‍यांनी वाहन वापरल्यास प्रति किलोमीटर बारा रुपयांनी वसुली करण्याचा फतवा काढला आहे. 
महापालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे. आस्थापना खर्च 35 टक्क्याऐवजी 62 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. काटकसरीने, जिकिरीने खर्च करण्याचा सार्‍यांनाच विसर पडला आहे. शनिवारी, रविवारी अथवा जोडून सुट्टया आल्या की, महापालिकेची वाहने घेऊन बाहेरगावी जाण्याची पद्धत बर्‍याच वर्षांपासून रूढ आहे. त्यात अधिकार्‍यांसोबत पदाधिकारीही आघाडीवर आहेत. पेट्रोल, डिझेलवर दरवर्षी एक कोटीहून अधिक रुपये खर्च होत आहेत. त्यावर अंकुश ठेवण्याचे काम आयुक्तांचे आहे. पण त्यांनीही कधी त्याकडे लक्ष दिलेले नाही. खर्चात कपात करण्याच्या निव्वळ घोषणा होतात, प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य असते. 
त्यावर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त शेखर गायकवाड यांनी जालीम उपाय शोधला आहे. अधिकार्‍यांंच्या बैठकीत त्यांनी निर्बंध घातले.