जादा आसनांसहित धावणार एसटीची जनता बस
मुंबई, प्रतिनिधी, 19 - केवळ आरामदायी प्रवासासाठी करण्यात आलेल्या आसन कपातीमुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत असल्याने, एसटीच्या आसनांची संख्या वाढवण्याचा विचार महामंडळ करत आहे.
कमी आसनांमुळे होणार्या तोट्याबाबत आसन कपातीचा एसटीला मोठा फटका या आहे. त्यानंतर महामंडळाच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन 3 बाय 2 आसन व्यवस्था असलेल्या जनता बसचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या एसटीच्या ताफ्यातील निमआराम बस 3 लाख किलोमीटर धावल्यानंतर परिवर्तन बसमध्ये परावर्तीत केल्या जातात. यामध्ये आसनांची रचना 2 बाय 2 अशी करण्यात येते, मात्र यामुळे प्रवासी भारमान कमी होत असल्याने एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आसन कपातीमुळे महामंडळाला वर्षाकाठी तब्बल 1500 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.