गोल्फ क्लब मैदानावर रस्ता सुरक्षा अभियान
नाशिक , 19 - येथील जॉगर्स क्लब व प्रादेशिक परिवहन नियंत्रण कार्यालय यांनी गोल्फ मैदानावर संयुक्त 27 वे रस्ता सुरक्षा अभियान-2016 उत्साहात पार पडले. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, वाहतूक पोलीस उपायुक्त विजय पाटील, उपप्रादेशिक अधिकारी भरत कळसकर, प्रकाश झनकर, शाहू खैरे, जॉगर्स अध्यक्ष नाना निकुंभ, अविनाश राऊत, सुहास सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी अशोक मुर्तडक यांनी शहरवासीयांना गाडी चालवताना हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला. गाडी चालवताना मोबाइलवर बोलू नका, सिग्नलवर थांबताना झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबा यासह सर्व वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विजय पाटील, भरत कळसकर यांनीही मनोगत व्यक्त केले.