अभिनेता नवाझुद्दीन विरोधात गुन्हा दाखल
मुंबई, 18 - बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नवाझुद्दीनसमोर पहिल्यांदा अडचण निर्माण झाली आहे.
नवाझुद्दीन सिद्धीकीचे सोसायटीत गाडीच्या पार्किंगवरून एका महिलेशी बोलताना असभ्य भाषेत नवाझुद्दीन बोलला असल्याचे सांगण्यात येत आहे. नवाझुद्दीव सिद्धिकीवर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
