Breaking News

नाशिक-मुंबई विमानसेवा लांबणीवर


नाशिक, 18 - नाशिकच्या विमानसेवा वैमानिकांच्या कमतरतेमुळे एअर इंडियाची नाशिक-मुंबई विमानसेवा 27 जानेवारीला सुरू होण्याची शक्यता माहिती सुत्रांनी दिली आहे. 
आतापर्यंत किमान चार कंपन्यांनी नाशिक विमानतळावून सेवा सुरु केली होती. पण काही ना काही कारणांमुळे ती बंद झाली. अखेर एअर इंडियाने 70 सीटर विमानाद्वारे नाशिक-मुंबई सेवा सुरु करण्याची घोषणा नोव्हेंबर 2015 मध्ये केली होती. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैमानिकांच्या कमतरतेमुळे नाशिक-मुंबई विमानसेवा आता 27 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.