सिद्धीविनायकाचे 20 ते 24 जानेवारीपर्यंत दर्शन बंद
मुंबई, 18 - मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक गणेश मूर्तीला 20 ते 24 जानेवारीदरम्यान सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना सिद्धीविनायकचं दर्शन घेता येणार नाही.
परंतु, या कालावधीत भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येईल. सोमवारी 25 जानेवारी रोजी गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्यातून दर्शन घेता येईल, मंदिर न्यासाचे उपकार्यकारी अधिकारी रवी जाधव यांनी ही माहिती दिली आहे.