Breaking News

पुणे ते लोणावळा लोकलला लवकरच चार नवीन रेक उपलब्ध

 पुणे (प्रतिनिधी) । 20 -  पुणे ते लोणावळा लोकलसाठी लवकरच प्रवाशांना 4 नवीन रेक मिळणार आहेत. मध्य रेल्वेतर्फे 18 रेक दिले जाणार आहेत. यापैकी 4 रेक पुणे-लोणावळा लोकलसाठी मिळणार आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी लोकलच्या फेर्‍याही वाढवण्यात येणार आहेत. 
पुणे ते लोणवळा दरम्यान थर्ड लेन बद्दलही प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव 43 कोटींचा आहे. लवकरच हा प्रस्ताव रेल्वे बोर्डातर्फे ठेवण्यात येईल, अशी माहिती मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक एम. के. सूद यांनी दिली. पुणे रेल्वे स्थानकात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यामध्ये ही माहिती देण्यात आली.
सुरक्षेच्या दृष्टिने लोकलमध्ये महिला कोचमध्ये सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती पण एस. के. सूद यांनी दिली.  एस.के. सूद लोणावळा ते पुणे वार्षिक सर्वेक्षणासाठी आले होते. हे सर्वेक्षण सुरक्षेच्या दृष्टिने करण्यात आले. लवकरच पुणे रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांना वायफाय ची सुविधा पण उपलब्ध होणार आहे. मुंबईमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरु केले होते. जे यशस्वी झाले. यामुळे पुण्यातही ही योजना राबवणार आहोत, असेही एस.के. सूद म्हणाले. रेल्वेमध्ये दारात पाय बाहेर सोडून बसलं जातं. हे खूप धोकादायक आहे. यामुळे अशांवर कडक पावले उचलली जातील असेही सूद म्हणाले.