Breaking News

महाराष्ट्र पाच वर्षात दुष्काळमुक्त करु : मुख्यमंत्री


 खेड/प्रतिनिधी । 18 - राज्यात सातत्याने पडणार्‍या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची दयनीय स्थिती झाली आहे, मात्र येत्या 5 वर्षात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी दिली. 
कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान, जलबिरादरी महाराष्ट्र व सिंधुभूमी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील महाळुंगे येथे जलपरिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देशाचे रॅमन मॅगासेसे व जलक्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता आदी उपस्थित होते. गेल्या दीड वर्षात सहा हजार गावातून करोडो बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवून 24 टीएमसी पाणीसाठा करण्यात आला आहे. यापुढे जलयुक्त शिवार अंतर्गंत अनेक ठिकाणी असे बंधारे बांधून राज्यातील दुष्काळ मुक्तीसाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील आहोत. 24 टीएमसी पाणी साठवून सुमारे सहा लाख हेक्टर जमिनीला शाश्‍वत सिंचन मिळाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.