Breaking News

कुपोषीत बालकांवर उपचार उंचावण्यासाठी पोषण केंद्राची स्थापना



परभणी, दि.04 - सद्यस्थितीत कुपोषीत बालकांचे प्रमाण पाहता शासनाने बालकांचे कुपोषण कमी करणेकरीता व कुपोषीत बालकांचे आरोग्य  दर्जा उंचावणेकरीता पोषण पुनर्वसन केंद्राची विविध रुग्णालयामध्ये सुरुवात केलेली आहे.
      त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय,परभणी येथे पोषन पुनर्वसन केंद्रास मंजुरी प्रप्त झाली आहे.त्या नुसार जिल्हा रुग्णालय,परभणी येथे बालरुग्ण कक्षातील इमारतीमध्ये पोषण पुनर्वसन केंद्राची कार्यन्वीत करण्यात आले आहे.केंद्राचे उद्रघाटन डॉ.एम.टी.जाधव,वरिष्ठ बालरोग तज्ञ तथा निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले केंद्राच्या उद्रद्याटन प्रसंगी डॉ.जावेद अथर जिल्हा शल्य चिकित्सक,परभणी डॉ.पी.के.डाके,वैद्यकीय अधिक्षक,अस्थिव्यंग रुग्णालय परभणी,डॉ.के.बी.चौधरी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय,डॉ.कनकुटे,वैद्यकीय अधिक्षक,स्त्री रुग्णालय,डॉ.पुरी,बाल रोग तज्ञ,डॉ.जिकरे,बालरोग तज्ञ,डॉ,विशाल पवार,बालरोग तज्ञ,डॉ.शेख मोईन,बालरोग तज्ञ,श्रीमती.देशमुख,श्रीमती सोनटक्के परिसेविका,श्रीमती कुलकर्णी परिसेविका,श्रीमती.आचारे पी एच एन,श्रीमती.देशपांडे अधिपरिचारीका,श्रीमती.रशिदा बेगम आहार तज्ञ,श्रीमती.रश्मी जोशी आहार तज्ञ,आदी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
 सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना पोषण पुनर्वसन केंद्रा बाबतची संपूर्ण माहिती श्रीमती.रश्मी जोशी यांनी दिली.या प्रसंगी डॉ.जावेद अथर,डॉ.एम.टी.जाधव,डॉ.डाके,व डॉ.के.बी.चौधरी यांनी पोषण पुनर्वसन केंद्र व बालकांच्या आरोग्या बदल विशेष मार्गदर्शन केले.
      उद्रघाटन प्रसंगी या पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये 2 कूपोषीत बालकांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.तसेच या केद्रामध्ये सॅम बालकांस दाखल झाल्यापासून पूढे 14 दिवस उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे.तसेच त्या बालकांच्या मातेस बुडीत मजुरी त्या मातेस व बालकांस आहार देण्यात येणार आहे.