Breaking News

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी


परभणी, दि.04 - अविष्कार संस्थेतर्फे राहुल नगर परभणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती (महिलामुक्तीदीन)  साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन संपत शिंदे, सह्याद्रीचा वाघ सुधीर साळवे, पवन शिंदे, रत्नमाला गजभिये, राहुल गजभिये आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रास्ताविकामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रदीप एंगडे सांगितले की, आपल्या देशामध्ये ज्या थोर महानायक होऊन गेला त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवला. जिजाऊंनी दोन छत्रपती घडवुन प्रजेमध्ये स्वाभिमानाचे असे बिज पेरणी करुन समाजाचा रोप पत्कारुन स्त्रि व शुद्रांकरीता शिक्षणाचे दारे मोकळी करुन अनिष्ठ विरुध्द आवाज उठवला यांच्या कार्याचे स्मरण करुन इतरांना प्रेरणा मिळो हिच कार्यक्रम घेण्याची भुमिका विशद केली. यावेळी मुख्य व्याख्याते पवन शिंदे, संपत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनिषा पैठणे यांनी तर 
आभार राहुल भराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीजाबाई खाडे, प्रयागबाई एंगडे, संजय एंगडे, रत्नमाला एंगडे, निलेश बनसोडे, सरोदे मॅडम, शेेषेराव खाडे, अनिल कुरवाडे, उमेश शेळके, सुप्रिया गायकवाड, इंदु खंदारे, गंगाराम खाडे, धापसे यांनी प्रयत्न केले.