Breaking News

कुटुंबांच्या जडण-घडणीमध्ये स्त्रीचा मोलाचा वाटा: डॉ.प्राची

 अहमदनगर । प्रतिनिधी । 29 -  महिलांनी नेहमीच उद्यमशील राहून एकमेकीच्या विचारांची देवण घेवण केल्यास खर्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण होणार आहे. स्त्री कुटुंबाला दिशा देत असते. कुटुंबाच्या जडण घडणमध्ये स्त्रीचा मोलाचा वाटा असल्याने, वयाच्या वलनावर महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.प्राची पाटील यांनी केले.
प्रयास ग्रुपच्या वतीने मकर संक्रात निमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉ.प्राची पाटील बोलत होत्या. याप्रसंगी डॉ.मीना पोटे, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सौ.शालू राजपुत, विजया बोरा, पुजा सालानी, जागृती ओबेरॉय, सुप्रीया सदगुणे, रंजना सिकची, नलिनी दुसुंगे, निर्मलाताई मालपाणी, सुरेखा भोसले, मधू बोरा, चैताली देवकर, अपेक्षा संकलेचा, शोभना गट्टाणी, अनुराधा कुमार, रजनी कंत्रोड, मनिषा देवकर, कमल गांधी, अविता धामट, गौरी जोशी, भाग्यलक्ष्मी भट, चंद्रकला सुरपुरिया आदी उपस्थित होत्या.
डॉ.प्राची पाटील म्हणाल्या की, स्त्री आयुष्यभर कुटुंबासाठी वाहून घेत असते. कुटुंबाची खरी धुरा स्त्री सांभाळत असल्याने तीचे आरोग्य उत्तम राहणे कुटुंबाच्या दृष्टीने गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी स्त्रीयांनी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगून, मुलांना संस्कारित करण्यासाठी स्त्रीयांनी टिव्ही पासून दूर राहून घरात सदस्यांशी संवाद साधण्याचे महिलांना त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा यांनी महिलांसाठी ग्रुपच्या वतीने राबवले जाणार्या कार्यक्रमाची माहिती दिली.  
स्त्रीयांनी उंबरठा ओलांडून स्पर्धेच्या युगात नेहमीच उद्यमशील राहणे आवश्यक आहे. महिलांनी उद्योजिका होऊन, आपल्या मुलीं प्रमाणे सुनेला देखील प्रोत्साहन देऊन संधी द्यावी. स्त्रीभ्रुण हत्या टाळण्यासाठी महिलांचा दृढ संकल्प मोठे कार्य करु शकत असल्याची आशा निर्मलाताई मालपाणी यांनी व्यक्त केली.  
घेण्यात आलेल्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत प्रथम- शर्मिला पाटील, द्वितीय- वंदना गारुडकर, तृतीय सावित्री सोमाणी उत्तेजनार्थ- मनिषा चंगेडिया, सोनल लखाटा आदीसह 10 विजेत्या स्पर्धक महिलांना चांदीचे नाणे बक्षिस स्वरुपात देण्यात आले. महिलांनी एकमेकीस हळदी कुंकू लावत वाण दिले व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौरी जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार मधू बोरा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता गुगळे, कमल गांधी, शोभना गट्टाणी, भाग्यश्री झंवर, दीपा मालू आदींनी परिश्रम घेतले.