Breaking News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शहर कार्यकारणी जाहीर


 अहमदनगर । प्रतिनिधी । 29 -   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) ची शहर कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. शासकिय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकित शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी नवकार्यकारणी जाहिर केली. निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकारींना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
 आरपीआयच्या शहर कार्याध्यक्षपदी रफिक पठाण, शहर उपाध्यक्षपदी सागर ढगे, नितीन घोरपडे, विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी श्रीकांत वाघचौरे, उपनगर उपाध्यक्षपदी जावेद सय्यद यांची निवड करण्यात आली. तसेच विनीत पाडळे यांची शहर सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली. 
बैठकित शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, आरपीआय संघटना सर्व जाती, धर्मातील बांधवाना एकत्र घेऊन समाजात कार्य करत आहे. दलित व मुस्लिमांचा वापर फक्त वोट बँक म्हणून केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रश्‍नाकडे डोळेझाक केली जात आहे. पक्षाच्या वतीने समाजाच्या तळागाळा पर्यंत काम चालू आहे. समाजातील जातीय प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी व दीन दलितांना समाजात स्थान मिळण्याकरिता, धोरणात्मक बाबी शासनाने राबवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   
बैठकिच्या प्रारंभी जातीयवादाने आत्महत्येस बळी गेलेल्या रोहित वेमुला श्रध्दांजली वाहण्यात आली व या घटनेचा पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. बैठकीमध्ये शहरात साजरी करण्यात येणार्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 वी जयंती उत्सवाचा आढावा घेण्यात आला. पक्षाच्या वतीने जयंती निमित्त राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी राकेश चक्रनारायण, मोहित मोरे, मुस्ताक शेख, आकाश पाडळे, संजय इंगळे, गणेश गायकवाड, राहुल भिंगारदिवे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.