Breaking News

चव्हाणांची आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशी ?

मुंबई, 28 - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची आदर्श घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला राज्यपाल आणि मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदिल मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
आदर्श घोटाळ्याप्रकरणी जस्टीस पाटील अहवालात चव्हाण यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र राहुल गांधी यांच्या दबावामुळे तत्कालीन राज्यपालांनी सीबीआय चौकशीस परवानगी नाकारली, असा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.