Breaking News

तिरंगा फडकवणार्‍याला पाकिस्तानात 10 वर्षे शिक्षा

नवी दिल्ली, 28 - पाकिस्तानात टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करताना तिरंगा फडकवणार्‍या एका व्यक्तीला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
पाकिस्तानात भारतीय झेंडा फडकवल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्याचे नाव उमर दराज असून त्याला सुरुवातीला न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र आज त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त आहे. उमरने त्याच्या घरावर तिरंगा फडकवला हो
ता. बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, उमरने पोलिसांना सांगितले, ’मी भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा फॅन आहे. त्यासाठी असे केले. मला एक आरोपी किंवा हेर म्हणून पाहू नका, टीम इंडियाचा फॅन म्हणून माझ्याकडे बघा. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. पाकिस्तान पोलिसांनी त्याच्याविरोधात चझज-16 आणि पाकिस्तान पीनल कोड 123-- नुसार गुन्हा दाखल केला होता.